मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (12:30 IST)

पुण्यात निषेधाच्या पणत्या पेटवून नागरिकांनी दिवाळी साजरी केली

पुणे कामगार पुतळा येथे होत असलेल्या मेट्रो प्रकल्पाचा उभारणीमुळे येथे राहणाऱ्या झोपडपट्टीचे नागरिक संतप्त आहे. त्यांच्या मागणीला मान न देता त्यांचे म्हणणे एकूण न घेता दमदाटीने स्थलांतर केल्याच्या कारणा वरून नागिरकांनी संतप्त व्यक्त केला असून निषेधाची पणती लावून दिवाळी साजरी केली आहे. सध्या काही झोपडपट्टीचे नागरिक शिवाजी नगर येथे असलेल्या सरकारी भुखन्डावर पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. परंतु सरकार याचा कडे दुर्लक्ष करत आहे. शिवाजी नगर येथे काही भूखंड पडीक असून त्याचावर आम्हाला राहण्यासाठी घरे द्यावी अशी मागणी नागरिक करत आहे. परंतु सरकार या कडे दुर्लक्ष करत असून महामेट्रोवर लक्ष केंद्रित करत आहे या साठी सरकारचा निषेध म्हणून नागरिकांनी पणती पेटवून आपला निषेध व्यक्त केला आहे