गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (15:43 IST)

चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच राष्ट्रवादीचे प्रचाराचे वाजले गाणे, डीजेवर गुन्हा दाखल

chandrakant patil
भारतीय जनता पक्षाचे नेते, पालकमंत्री आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील  यांच्यासमोरच एका कार्यक्रमात चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचाराचे गाणं वाजल्याचा प्रकार समोर आला आहे. चंद्रकांत पाटील हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी डीजेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गाणं सुरु झालं. चंद्रकांत पाटील  तिथून आले असतानाच हे गाणं सुरु झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर आता ही साऊंड सिस्टीम विनापरवाना लावल्याचे सांगत पोलिसांनी त्यावर गुन्हा दाखल केला आहे.
 
दिवाळी निमित्त पुण्यातील रास्ता पेठेत असलेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमावेळी चंद्रकांत पाटील येताच डीजेवर अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार गीत लावले. यानंतर पोलिसांनी साऊंड सिस्टीम लावणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. साऊंड सिस्टीम विना परवाना लावण्यात आली असे कारण देत डीजेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor