गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 22 डिसेंबर 2021 (15:03 IST)

पिंपरी-चिंचवडमध्ये आढळला ओमायक्रॉन चा नवीन रुग्ण

कोरोना विषाणूचा नवीन व्हेरियंट हळू-हळू देशात पाय पसरत आहे. राज्यात देखील ओमायक्रॉनचे नवीन रुग्ण सापडत आहे. पुण्याच्या पिंपरी-चिंचवड शहरात ओमायक्रॉनचा नवीन रुग्ण सापडला आहे. या रुग्णाला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. शहरात ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्यात वाढ झाली असून सध्या दोन रुग्ण सक्रिय आहेत. या पैकी एक शहराबाहेरच्या आहे. अशा प्रकारे रुग्णसंख्या 12 झाली आहे. या रुग्णांमध्ये परदेशातून आलेल्या 5 जणांचा समावेश आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेले 7 जण आहे .परदेशातून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 46 जणांची तपासणी करण्यात आली. आणि त्यांचा चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्या पैकी अजून 30 जणांची चाचणी 10 दिवसानंतर केल्यावर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडले असून होम क्वारंटाईन केले आहे. 
सध्या देशात आफ्रिका आणि युरोपीय देशात पसरणाऱ्या कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन चा प्रादुर्भाव वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने  यासाठी खबरदारी घेण्यास सांगितले असून उपाययोजना करण्यास सूचना दिल्या आहेत.