संबंधित माहिती
- राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवर
- नागपूर : महुआ फ्लॉवर लिकर डिस्टीलरी वर छापा, १२ आरोपींना अटक तर लाखो रुपयांचा माल जप्त
- उल्हासनगर सुधारगृहातून 12 महिला कैदी फरार, 8 जणांना अटक
- LIVE: महाराष्ट्र सरकारने कडक कारवाई करीत कफ सिरपवर बंदी घातली
- धावत्या एसटी बसची मागील चाके निघाली, चालकाच्या विवेकबुद्धीमुळे मोठा अपघात टळला; अकोला मधील घटना
निलेश घायवळच्या अडचणीत वाढ, पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला
पुणे शहरात दहशत निर्माण करून परदेशात फरार झालेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुणे पोलिसांनी निलेशच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलिसांनी घायवळच्या कोथरूड परिसरातील दोन घरांवर छापा मारला आणि घरातून जिवंत काडतुसे जप्त केली.
घायवळ कडे कोणताही शस्त्र परवाना नसून देखील त्याच्याघरात जिवंत काडतुसे आढळल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घायवळचा पुण्यात काही मोठं करण्याचा कट होता का याचा तपास पुणे पोलीस करत आहे.
आरोपी गुंड निलेशला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी निलेशच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील घरी छापेमारी केली होती. तेव्हा पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. मात्र कोथरूडच्या घरातून जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.
Edited By - Priya Dixit
