सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 5 एप्रिल 2022 (23:38 IST)

आता वीज निर्मिती हायड्रोजन पासून होणार; ऊर्जा मंत्री नितीन राऊत

nitin raut
सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्यामुळे सर्वत्र इलेक्ट्रिक वाहनांना पसंती आहे. राह्याभरात इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंग साठी अनेक ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी ऊर्जा विभाग करत आहे. 
 
राज्यात पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जास्रोता पासून वीज निर्मिती सुरु असतानाच भविष्यात हायड्रोजन पासून वीज निर्मिती करण्यात येणार. अशी घोषणा राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पुण्यात आयोजित एका पर्यायी इंधन परिषदेत केली. 
 
अपारंपरिक उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार लवकरच अपारंपरिक ऊर्जा धोरण 2020 मध्ये सुधारणा करून अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारणी करण्यासाठी गुंतवणूकदारांना प्रोत्साहन दिले जातील.असे ही त्यांनी सांगितले.
 
आज पुण्यात अल्टरनेटिव्ह फ्युएल कॉन्क्लेव्हला संबोधित करताना डॉ. नितीन राऊत म्हणाले  आम्ही "पारंपरिक इंधनापासून वीज निर्मितीवर आजवर केंद्रित होतो. आता हायड्रोजन उर्जेवर लक्ष केन्द्रित करत आहोत. लवकरच आता हायड्रोजनपासून वीज निर्मितीचा प्रयोग राज्यात सर्वप्रथम होईल,". 
 
महाराष्ट्र सरकारने ऊर्जा विभागाच्या अंतर्गत महावितरणची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी आणि खाजगी व्यावसायिकाला चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी आवश्यक साहाय्य करण्यात येणार आहे.    
 
"वाहतूक क्षेत्रातील हरित ऊर्जेचा वाढता वापर सुलभ करण्यासाठी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी सक्रिय पुढाकार घेत आहे. महावितरण, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी आणि महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने पेट्रोल पंपाच्या आवारात चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी पेट्रोल कंपन्या सोबत संयुक्त उपक्रम स्थापम करण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास भविष्यात शाळांमध्ये आणि कॉलेज मध्ये चार्जिंग स्टेशनांची संख्या वाढवता येईल. जेणे करून विद्यार्थ्यांना आपली वाहने सहजपणे चार्जिंग करता येईल. असे ही ते म्हणाले. 
 
या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कार्बन फूट प्रिंट्स कमी करण्याचा हेतू ने  दिवसाला चार्जिंगचे दर 5.50 रुपये प्रति युनिट तर रात्री 10 ते सकाळी 6 वाजे पर्यंत चार्जिंग दर 4.50 रुपये प्रति युनिट असेल. असे ही ते म्हणाले.