शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 4 एप्रिल 2022 (14:12 IST)

व्हायरल: पुण्याच्या शाळेत धक्काबुक्की

बिबवेवाडी येथील क्लाइन मेमोरियल शाळेनंतर पुण्यात पुन्हा एकदा पुण्यातील एका खासगी शाळेत पालकांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे.  शहरातील उंड्री या भागात युरो शाळेच्या सुरक्षा रक्षकांकडून पालकांना ही वागणूक मिळाल्याचं स्पष्ट झालंय. 
 
 शालेय शुल्काबाबत ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी केल्या होत्या. त्या विद्यार्थ्यांना शाळेने मेलद्वारे टीसी पाठवून दिलं. या शाळेत विद्यार्थ्यांना थेट प्रवेश नाकारण्यात आला.
 
प्रवेशावेळी पालक शाळेत गेल्यानंतर त्यांना सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की झाली. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत बाऊन्सर न ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र आता सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.