मंगळवार, 16 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 एप्रिल 2022 (16:48 IST)

मुलीनेच आपल्या बालविवाहाची तक्रार केली, आई वडिलांसह सासरच्या लोकांचा विरुद्ध गुन्हा दाखल

The girl herself complained about her child marriage
हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात एका अल्पवयीन मुलीने आपला बालविवाह एका आरोपी सोबत लावल्याची तक्रार केली आहे. तीन महिने ही मुलगी सासरी नांदली नंतर अकोला रेल्वे स्थानकावर पोलिसांना आढळून आली तिची चौकशी केल्यांनतर हा प्रकार उघडकीस आला. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात वास्तव्यास असलेले केशव वंजे यांनी आपल्या अल्पवयीन कन्येचे विवाह नांदेडच्या प्रसाद राऊत यांच्यासह डिसेंबर 2021 मध्ये केले. मुलीचा नवरा एका गुन्हा मध्ये आरोपी आहे. ही मुलगी लग्नानंतर तीन महिने सासरी राहिली. नंतर ती अकोल्याच्या रेल्वे स्टेशन वर एकटीच पोलिसांना आढळली तिला विचारपूस करता तिने सर्व घडलेला प्रकार सांगितला.मुलीला बाल सुधार गृहात पाठविण्यात आले आहे. तिथे तिने आपल्यासोबत घडलेलं सांगितले. 
 
मुलीसोबत पती प्रसाद याने मुलगी अल्पवयीन असून देखील शारीरिक संबंध स्थापित केल्याचे मुलीने सांगितले. मुलीच्या तक्रारीवरून मुलीच्या आई-वडील सासरचे मंडळी, नंणद आणि पती यांचावर बाल विवाह प्रतिबंध कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.