जिह्यात सेवा समाप्तीचे 39 एसटी कर्मचारी कामावर परतले
रत्नागिरी जिह्यामध्ये संपामुळे सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आलेले 39 कर्मचारी पुन्हा एकदा कामावर हजर झाले आहेत़ या कर्मचाऱयांनी मागील काही दिवसात कामावर हजर होण्यासाठी अर्ज दाखल केला होत़ा त्यानुसार एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून तातडीने अर्जाचा विचार करत कामावर हजर होण्यास मंजुरी दिल़ी आता कारवाई झालेले आणखी कर्मचारी कामावर हजर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े
राज्य शासनाकडून 31 मार्चपर्यंत कामावर हजर होण्यासाठी आवाहन केले होत़े त्यानंतर कठोर कारवाई करण्यात येईल, असे संकेत राज्य शासनाकडून देण्यात आले होत़े आता 1 तारखेनंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे रत्नागिरी विभागाकडून सांगण्यात आले. आतापर्यंत एसटीच्या 185 कर्मचाऱयांना बडतर्फ करण्यात आले आह़े तर 237 जणांवर सेवा समाप्तीची कारवाई रत्नागिरी विभागाकडून करण्यात आली आह़े तर पुढील दिवसात आणखी काही कर्मचारी हे सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई सुरूच राहणार असल्याचे रत्नागिरी वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.
रत्नागिरी विभागात सुमारे 4 हजार एसटी कर्मचारी आहेत़ यापैकी 700 कर्मचारी कामावर हजर होत आहेत़ तर 187 कर्मचारी हे अधिकृत रजेवर आहेत. त्यानुसार उर्वरित कर्मचाऱयांवर कारवाईचे पाऊल विभागाकडून उचलण्यात आले आह़े कर्मचाऱयाना नोटीस देवून कायदेशीर बाबी तपासून बडतर्फी अथवा सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येत असल्याचे रत्नागिरी विभागाकडून सांगण्यात आल़े