शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 (21:35 IST)

मालगाडीचे डबे रुळावरून घसरले

Malgadi
दौलताबाद रेल्वेस्टेशनजवळ रेल्वे मालगाडी रॅक घसरली. यात एका रुळावरून थेट दुसऱ्या रुळावर अशा अवस्थेत हे रॅक घसरले. त्यामुळे रोटेगाव काचीगुडा पॅसेंजर पोटूळ रेल्वे स्टेशनवर, जालना दादर जनशताब्दी औरंगाबाद स्टेशनवर, निजामाबाद पुणे पॅसेंजर औरंगाबाद स्टेशनवर, अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेस लासुर स्टेशनवर थांबून ठेवण्यात आली आहे.  मालगाडी असल्याने यामध्ये कुठलीही जिवितहानी झालेली नाही. ही घटना नेमकी कशामुळे घडली हे मात्र अजून समोर आलेली नाही. यामुळे परभणी ते मनमाड दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून, वाहतूक पुर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी किमान दुपारी 12 ते 1 वाजेल असा प्राथमिक अंदाज आहे.
 
घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद रेल्वे स्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे, अशोक निकम यांच्यासह रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.