मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: कोल्हापूर , शनिवार, 2 एप्रिल 2022 (08:31 IST)

राजर्षी शाहूंचा समतेचा विचार महाविकास आघाडीने पुढे नेला : बाळासाहेब थोरात

जयश्री ताईंना निवडणून देणं म्हणजे ताराराणीना अभिवादन आहे हे लक्षात घ्या. राजर्षी शाहूंचा समतेचा विचार महाविकास आघाडी पुढे घेऊन जात आहे. त्यामुळे अण्णांच्या माघारी आमची जबाबदारी हे लक्षात ठेवून त्यांना निवडून द्या. असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ते महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ कोल्हापुरात बोलत होते.
 
मंत्री थोरात पुढे म्हणाले, ही सभा पाहील्यावर 50 हजारापेक्षा जास्त मतांनी जयश्री ताई निवडून येतील याची खात्री झाली. कोरोनाची बाधा झाली तरी चंद्रकांत जाधवांनी जीवाची पर्वा केली नाही. असेही थोरात म्हणाले. महाविकास आघाडीची संख्या १७१ आहे. ती आपल्याला कायम ठेवायची आहे. तीन पक्ष एकत्र आलो म्हणून अनेकजण म्हणत होते. हा 8/15 दिवसांचा कार्यक्रम आहे.असेही थोरात म्हणाले.
 
प्रत्येक संकटात महाविकास आघाडीने यशस्वी काम केले. हे सरकार कस पडेल? याचा प्रयत्न होत आहे. पण जेवढा लांब करण्याचा प्रयत्न कराल, तेवढे आम्ही जवळ येऊ. असे थोरात म्हणाले. यापूर्वी पेट्रोलची ५० पैसे वाढ झाली तरी भाजप वाले आंदोलन करत होते. आता हे आंदोलक कुठे गेले? हे चंद्रकांत पाटील यांना एकदा विचारा.असेही थोरात म्हणाले.