1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 एप्रिल 2022 (08:36 IST)

मराठी नववर्ष आशा, आकांक्षाचे नवे पर्व घेऊन येईल –मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Marathi New Year will bring a new era of hope and aspiration - Chief Minister Uddhav Thackeray
मुंबई:- मराठी नववर्ष प्रारंभ आणि गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हे नववर्ष आशा, आकांक्षाचे नवे पर्व घेऊन येईल, असे मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
 
मुख्यमंत्री म्हणतात, ‘आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळे एका बिकट परिस्थितीवर मात करू शकलो आहोत. निर्बंधातून मुक्त होऊ शकलो. हीच सज्जता, सतर्कता यापुढेही ठेवूया. अशा अनेक आव्हानांवर मात करण्याची ताकद, हिंमत अंगी बाणवूया. त्यासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा”.