1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (12:31 IST)

पुण्यात या दिवशी या भागात पाणीपुरवठा बंद असणार

water tap
सध्या पुणे शहरात पाणी टंचाईच संकट वाढत हे. अद्याप पाणी कपात केली नसल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. पुण्यात कळस,कल्याणीनगर, रामवाडी, विमाननगर  भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा.

सध्या भामा आसखेड प्रकल्पांतर्गत कुसमाडे वस्तीतील नवीन टाकीला मुख्यवाहिनी जोडण्याचे काम आणि ठाकरसी टाकीवरील स्थापत्य विषयक काम कर्णयुगासाठी गुरुवारी पाणी पुरवठा बंद असून शुक्रवारी कमी दाबाने उशिरा पाणी येणार आहे. अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. 
 
या व्यतिरिक्त आदर्श नगरं शास्त्रीनगर, म्हस्के वस्ती परिसर, रामवाडी,हरीनगर, माळवाडी, जाधववस्ती, विश्रांतवाडी, विशाल परिसर जयजवान नगर, जय प्रकाश नगर, सर्वे क्रमांक ११२ अ, कस्तुरबा, टिंगरेनगर पंप ते विश्रांतवाडी चौक, दिनकर पठारे वस्ती, संजय पार्क, पराशर सोसायटी, ठुबे पाठारे नगर, श्री पार्क या भागात पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहील.    
 
 Edited by - Priya Dixit