शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जून 2022 (08:42 IST)

पुण्यात वैमानिकाची16 लाखांची फसवणूक

fraud
वैमानिकाची /पायलट म्हणून काम करत असलेल्या आणि पुण्यात राहावयास असलेल्या एका वैमानिकाची व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने 16 लाख 62 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनोळखी मोबाईलधारक, बँक खातेधारक यांच्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात आयटीॲक्ट आणि आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आकाश दिप सिंधु (वय-47, रा. मोहम्मदवाडी, पुणे) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. सदर प्रकार 28/6/2021 ते 5/7/2021 यादरम्यान घडला असून, संबंधित तक्राराचा अर्ज पोलिसांकडे दाखल झाल्यानंतर त्याबाबत चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल होण्यास विलंब लागला आहे. आरोपींनी स्टोन. इमिको. क्लब या वेब ॲड्रेसमध्ये ते रेड वाईन बनविण्याकरिता आवश्यक असणारे स्पाईस टेड्रिंगचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. त्यांची साखळी संपूर्ण देशभरात पसरलेली असून, ते डीबीएस बँकेच्या वतीने चालविले जाते असे सांगत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले.