शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मे 2022 (14:23 IST)

Career Tips : पायलट कसे व्हावे: पायलट होण्यासाठी खर्च, कोर्स, कालावधी आणि पात्रता जाणून घ्या

प्रत्येकाचं स्वप्नं असत की त्याने आकाशात उडावे. हे स्वप्नं पूर्ण करण्याचे 2 मार्ग आहे. एकतर विमानाचे तिकीट खरेदी करा आणि प्रवास करा. किंवा स्वतः विमान उडवावे. ज्यांना स्वतः विमान उडवायचे असेल तर त्यासाठी त्यांना पायलट व्हावं लागणार. पायलट बनून विमान उडवायचे स्वप्नं पूर्ण करू शकता. लोकांना पायलट का व्हायचे आहे याचे पहिले कारण म्हणजे पगार. कमर्शियल पायलट नोकर्‍या ही भारतातील सर्वात जास्त पगाराची नोकरी मिळते. या व्यतिरिक्त इतर फायदे देखील आहे. हे उच्च श्रेणीचे काम मानले जाते. वैमानिकांची संख्या इतर व्यवसायांपेक्षा कमी असल्याने नोकरी मिळणे अवघड नसते.
 
पायलट कसे व्हावे: 
भारतात 2 प्रकारे पायलट बनवले जातात, पहिला मार्ग म्हणजे नागरी विमान वाहतूक, ज्यामध्ये व्यावसायिक पायलट बनवले जातात आणि दुसरा मार्ग म्हणजे भारतीय संरक्षण दल या मध्ये पायलट बनण्यासाठी प्रथम वायुसेनेत सामील व्हावे लागणारं.
 
व्यावसायिक किंवा कर्मशियल पायलट म्हणजे काय ?
 
व्यावसायिक पायलट जो एअरलाइनसाठी विशिष्ट विमान उडवतो, ज्यासाठी त्याला भारतीय प्राधिकरणाकडून व्यावसायिक पायलट प्रमाणपत्र मिळते.  उदाहरणार्थ, एअर इंडिया, इंडिगो, जेट एअरवेज यांसारख्या भारतीय विमान कंपन्यांमध्ये चालणारे वैमानिक हे सर्व व्यावसायिक वैमानिक आहेत. एखादा व्यावसायिक पायलट विमानात असतो तेव्हा तो शेकडो लोकांच्या जीवाला जबाबदार असतो. त्या लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जलद आणि सुरक्षित नेणे हे त्याचे काम असते.
 
कोणत्या विषयाचा अभ्यास करावा?
विमानचालनाला करिअर बनवण्यासाठी विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. जर तुम्ही अजून 11वीला बसला नसाल तर तुम्हाला 11वी मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय द्यावे लागतील. किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगमधून हे विषय करू शकता. त्यानंतरच तुम्ही पायलट कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता.
 
पायलट होण्यासाठी प्रवेश परीक्षा
पायलट ट्रेनिंग कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी, तुम्हाला एक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल ज्यामध्ये लेखक चाचणी, मीकल परीक्षा आणि मुलाखत असते. या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला बारावीत किमान 50% गुण असणे आवश्यक आहे.
 
 व्यावसायिक पायलट कसे व्हावे-
 
प्रथम तुम्हाला फ्लाइंग स्कूलमध्ये प्रवेश घ्यावा लागेल. ज्यासाठी तुम्हाला लेखी परीक्षेसोबत खाली दिलेल्या स्टेप्स मधून जावे लागेल.
 
1 लेखी परीक्षा : सर्वप्रथम तुमची लेखी परीक्षा असेल ज्यामध्ये तुम्हाला गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राशी संबंधित प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. परीक्षेत बारावीपर्यंतचे तर्कशुद्ध प्रश्नही असतील.
2 पायलट अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट : या चाचणीमध्ये तुम्हाला तुमचे हवामानशास्त्र, हवाई नेव्हिगेशन, विमानाशी संबंधित प्रश्न विचारले जातील.
3 मुलाखत आणि वैद्यकीय : जे उमेदवार लेखी परीक्षेत पात्र ठरतील त्यांची वैयक्तिक मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल जी भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाद्वारे घेतली जाईल.
 
खर्च -
 पायलट होण्यासाठी अंदाजे किमान 15 ते 20 लाखांचा खर्च येतो. आणखी एक स्वस्त मार्ग आहे ज्यामध्ये कमी पैशात पायलट बनण्यासाठी सर्वप्रथम भारतीय संरक्षण दलात (वायुसेना) सामील व्हावे लागेल.
 
पगार -
व्यावसायिक पायलटचा पगार जास्त असतो. नवीन बनलेल्या पायलटचा प्रारंभिक पगार 80 हजार ते 1.5 लाख मासिक असतो, ज्यामध्ये तो व्यावसायिक एअरलाइन्ससाठी उड्डाण करतो. जे नंतर मासिक 3 लाख ते 5 लाखांपर्यंत पोहोचू शकते.
 
कोणत्या महाविद्यालयातून पायलट कोर्स  करावा -
चाइम्स एव्हिएशन अकादमी, मध्य प्रदेश
हरियाणा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल एव्हिएशन - (HICA)
भारत गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमी, रायबरेली - (IGRUA)
कार्व्हर एव्हिएशन अॅकॅडमी, महाराष्ट्र
राजीव गांधी अकादमी फॉर एव्हिएशन टेक्नॉलॉजी
ओरिएंट फ्लाइट स्कूल, पाँडिचेरी