गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: सोमवार, 14 जून 2021 (22:01 IST)

करिअर टिप्स , मेटिओरॉलॉजी अभ्यासक्रम आणि करियरचे पर्याय

मेटिओरॉलॉजी किंवा हवामानशास्त्र या अभ्यासक्रमात हवामानाची सम्पूर्ण प्रक्रिया आणि हवामानाचे पूर्वानुमान समाविष्ट आहे.हवामानशास्त्राच्या अचूक माहितीमुळे अनेक नैसर्गिक आपदांपासून होणाऱ्या नुकसानाला टाळता येऊ शकत.
 
 मेटिओरॉलॉजी शब्द ग्रीक शब्द मेटिओरॉल शब्दापासून तयार झाला आहे.ज्याचा अर्थ आहे आकाशात घडणाऱ्या घटनाक्रम.याचा अभ्यास भूगोल विषयांतर्गत केला जातो.मेटिओरॉलॉजी तज्ञास हवामानशास्त्रज्ञ किंवा वातावरण वैज्ञानिक म्हणतात. म्हणूनच आजकाल देशात आणि जगात हवामान तज्ञांच्या मागणीत वाढ झाली आहे.
 
 मेटिओरॉलॉजी वायुमंडलीय विज्ञानाची एक शाखा आहे जी हवामान आणि हवामानाच्या अंदाज तसेच आपल्या वातावरणातील बदलांचा अभ्यास करते. हवामानशास्त्रज्ञ म्हणजेच हवामान तज्ज्ञ, वादळ, चक्रीवादळ,तुफान यासारख्या घटनांविषयी आगाऊ माहिती देऊ शकतात जेणेकरुन देश आणि जगाच्या संबंधित सरकार त्यांच्या क्षेत्रातील रेड अलर्टद्वारे होणारी जीवित व मालमत्तेची होणारी संभाव्य हानी रोखू किंवा कमी करू शकतील .
 
हवामानाचा अंदाज सर्व लोकांसाठी उपयुक्त ठरू शकतो. प्रवासात जाण्यापूर्वी याचा उपयोग करून, लोकांना माहित होऊ शकेल की त्यांच्यासाठी कोणता मार्ग अधिक सुरक्षित असेल? गिर्यारोहक बर्फाचे तुफान आणि हिमस्खलनापासून स्वत: चे रक्षण करू शकतात. शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज देणारी सर्व माहिती खूप महत्वाची आहे. त्याचप्रमाणे, विमानात उड्डाण दरम्यान हवामानाच्या विविध परिस्थितीचीही काळजी घेतली जाते. हवामानशास्त्रज्ञ वादळ आणि त्सुनामीचा अंदाज देखील लावू शकतात आणि त्यानंतर भारतसह जगभरातील संबंधित भागातील लोकांना वेळेवर चेतावणी देखील दिली जाऊ शकते.
 
मेटिओरॉलॉजी  किंवा हवामानशास्त्रज्ञ साठी लागणारी पात्रता -
 
कोणत्याही हवामानतज्ज्ञांना गणिताचे आणि भौतिकशास्त्र विषयांचे चांगले ज्ञान असले पाहिजे आणि वातावरण जाणून घेण्याची तीव्र इच्छा असणे आवश्यक आहे. त्यांना प्रॉब्लम सॉल्विंग किंवा समस्या सोडवणे. डिसीजन मेकिंग, किंवा निर्णय घेणे, डेटा अनालिसिस किंवा डेटा विश्लेषण आणि कँयुनिकेशन कौशल्यांमध्ये कुशल असणे आवश्यक आहे.आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात,बहुतेक हवामानशास्त्रज्ञ त्यांच्या कामात उच्च तंत्रज्ञान आणि चांगले सॉफ्टवेअर वापरतात, म्हणून त्यांना संगणक आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे.
 
मेटिओरॉलॉजीचा अभ्यास करणारे विद्यार्थी काहीच वर्षांच्या अनुभवाच्या आधारे पाऊस,तापमान,दाब,आद्रता याचा अचूक अंदाज लावू शकतात.या क्षेत्रात असे अनेक परस्परसंबंधित क्षेत्र आहेत ज्यामध्ये पुरेसे संशोधनाची गरज आहे.उमेदवार आपल्या आवडीनुसार त्यात देखील करिअर बनवू शकतात.या विषयात आवड ठेवणारे उमेदवार या क्षेत्रात आपले उत्तम भविष्य घडवू शकतात.परंतु या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांनी लक्षात घेण्यासारखे म्हणजे की हे काम कोणते ऑफिस सारखे  
निश्चित वेळेचे नाही .गरज पडल्यास हवामानशास्त्रज्ञाना आठवड्यातून सातही दिवस आणि कोणत्याही वेळेस काम करावे लागू शकते. यांना सुट्टी किंवा सणासुदीच्या दिवशी देखील काम करावे लागू शकते.
 
हवामान तज्ज्ञ होण्यासाठी विज्ञान विषयांसह 10+ 2 उत्तीर्ण झाल्यावर बी.एस्सी पदवी ही अनिवार्य पात्रता आहे.त्यानंतर या विषयात पदव्युत्तर पदवीदेखील करता येते.या क्षेत्रात संशोधक किंवा वैज्ञानिक होण्यासाठी इच्छुकांना  युजीसी नेट परीक्षेत पात्रता झाल्यानंतर हवामानशास्त्रात. पी.एच.डी करावी लागेल
जरी एक वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रम हवामानशास्त्रात घेतला आहे, परंतु या क्षेत्रात करिअर करणारे इच्छुक उमेदवारांना पदवीला प्राधान्य देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रम मुख्यतः फिजिक्स किंवा मॅथ्समधून पदवी घेतलेल्या उमेदवारांसाठी सर्वात योग्य आहे.
 
हवामानशास्त्रज्ञ होण्यासाठी इच्छुक उमेदवार डायनेमिक मेटिओरॉलॉजी  , भौतिकीय मेटिओरॉलॉजी , थोडक्यात हवामानशास्त्र, हवामानशास्त्र, एयरॉलॉजी, वैमानिकी, कृषी हवामानशास्त्र इत्यादी विषयांमध्ये तज्ञ करू शकतात.
 
खाजगी आर्किटेक्ट फर्म, इमारती, कार्यालये, तलाव आणि उड्डाणपूल इत्यादींच्या डिझाइनिंगच्या वेळीही सल्लागार म्हणून हवामानशास्त्रज्ञांच्या सेवा घेतल्या जातात. तर हवामानशास्त्रज्ञ या सर्व ठिकाणी नोकर्‍या शोधू शकतात आणि त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी मिळवू शकतात.
 
यासह, ते आर्यभट्ट वेधशाळा विज्ञान संशोधन संस्था, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, भारतीय कृषी संशोधन परिषद, भारतीय वायु सेना, राष्ट्रीय रिमोट सेसिंग एजन्सी, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय अवकाश यासारख्या विविध सरकारी संस्थांमध्ये संशोधक आणि शास्त्रज्ञ म्हणून देखील काम करू शकतात.