मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: गुरूवार, 27 मे 2021 (11:51 IST)

सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करण्याची संधी, National Academy of Cyber Securityने अर्ज मागितले

सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करण्यास इच्छुक उमेदवारांसाठी संधी चालून आली आहे. हैदराबादमधील संस्थेने सायबर सिक्युरिटीच्या ऑनलाइन कोर्ससाठी अर्ज मागविले आहेत. हैदराबादच्या नॅशनल अॅकडमी ऑफ सायबर सिक्युरिटीने देशभरातून ऑनलाईन सायबर सिक्युरिटी कोर्सेससाठी अर्ज मागविले आहेत. 12वी, पदवीधर, डिप्लोमा, इंजीनियरिंग आणि पीजी उमेदवार वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकतात.
 
इन्स्टिट्यूट सायबर सिक्युरिटी ऑफिसर, सायबर सिक्युरिटी मॅनेजमेन्ट मध्ये डिप्लोमा, सायबर सिक्युरिटी मॅनेजमेंट मध्ये पोस्ट डिप्लोमा, सायबर सिक्युरिटी मध्ये सर्टिफिकेट कोर्स.
 
नेशनल अकेडमी ऑफ साइबर सिक्योरिटी (एनएसीएस) स्वर्ण भारत राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, ईबीसी, अल्पसंख्याक, पीएच, महिला उमेदवार आणि माजी सैनिक यांच्या मुलांना फीस 60 टक्के सूट देत आहे.
 
या अभ्यासक्रमानंतर सायबर सुरक्षा अधिकारी, माहिती अधिकारी, माहिती विश्लेषक, सुरक्षा आर्किटेक्ट, आयटी सुरक्षा अभियंता, सिस्टम सुरक्षा प्रशासक, इंफोर्मेशन रिस्क ऑडिटर, सिक्योरिटी एनालिस्ट, कंप्यूटर सिक्योरिटी इंसीडेंट रेस्पॉन्डर, वल्नेरेबिलिटी एक्सेसर, क्रिप्टोलॉजिस्ट, ट्रेनर, एजुकेशनल इंस्टीट्यूटमध्ये नोकरीची संधी मिळेल. या पाठ्यक्रमानंतर केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
 
या सर्व अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2021 आहे. या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज वेबसाइट www.nacsindia.org वर करता येईल. अधिक माहितीसाठी 7893141797 या दूरध्वनी क्रमांकावरही संपर्क साधता येईल.