मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2021
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 28 एप्रिल 2021 (16:40 IST)

सनरायझर्स हैदराबादपुढे बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्जचे आव्हान

पहिला सामना गावल्यानंतर दमदार कामगिरीत सातत्य राखणार्याआ चेन्नई सुपरकिंग्जचा संघ आयपीएलमध्ये बुधवारी सनरायझर्स हैदराबादविरूध्द विजयाचा प्रबळ दावेदार या रूपात सुरूवात करेल. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने सलग चार सामने जिंकत दमदार पुनरागमन केले आहे. आता त्यांना नवीन मैदान फिरोजशाह कोटलावरही आपले विजयी अभियान कायम ठेवण्याची अपेक्षा आहे. तर हैदराबादला चेन्नईच्या बलाढ्य आव्हानाला पार करण्यासाठी कसरत करावी लागेल.
 
चेन्नईकडून अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली आहे. त्याने रॉंयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूध्द फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणातही मोलाचे योगदान दिले होते. सलामीवीर ऋतुराज गायकवाड व फाफ डू प्लेसिस चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तर सुरेश रैना व अंबाती रायडू मोठ्या खेळीच्या प्रतीक्षेत आहेत. सीएसकेचे फलंदाज राशिद खानच्या आव्हानाला ओळखून आहेत. मात्र, हैदराबादचे अन्य गोलंदाज अपयशी ठरत आहेत व हीच संघाची कमकुवत बाजू आहे. अनुभवी भुवनेश्वर कुमार कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरत आहे. तर टी नटराजन दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. हैदराबादचा संघ कर्णधार डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, केन विलियम्सन व राशिद खान यांच्यावर बराच अवलंबून आहे. संघातील भारतीय खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्यांचा संघ चिंतेत आहे. त्यांच्या आघाडीच्या फलंदाजांवरच संघाची सर्व मदार आहे. मधल्या फळीतील व शेपटाकडील फलंदाज चालत नसल्याचे प्रकर्षाने दिसून आले आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला यावर लवकर उपाय मोजावे लागणार आहेत. वॉर्नरलाही लवकरच खराब फॉर्ममधून   सावरावे लागणार आहे. चेन्नईकडून दीपक चाहर, जडेजा, अनुभवी इरान ताहिर व सॅम कुरेनही चांगली गोलंदाजी करत आहेत.