शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. गुरूमंत्र
Written By
Last Modified: मंगळवार, 6 एप्रिल 2021 (16:06 IST)

असं असावं '10 ईयर चॅलेंज'

सोशल मीडियावर बरीच चॅलेंजेस दिली जातात. मध्यंतरी 'टेन ईयर चॅलेंज'बरंच गाजलं होतं. या संकल्पनेत थोडा बदल करून तुम्ही करिअरच्या दृष्टीने याचा विचार करू शकता. म्हणजे आजपासून दहा वर्षांनी तुम्ही करिअरच्या कोणत्या टप्प्यावर असाल याचं आकलन करायचं. करिअरच्या दृष्टीने स्वतःलाच दहा वर्षांचं म्हणजे 'टेन ईयर
चॅलेंज' कसं यायचं याबाबतच्या काही टिप्स...
* ध्येय ठरवणं सर्वात महत्त्वाचं. कोणत्याही ध्येयाशिवाय घेतलेल्या निर्णयांना काहीही अर्थ नसतो. मात्र ध्येयठरलेलं असेल तर तुम्ही प्रत्येक निर्णय त्याच्याशी जोखून घेऊ शकता.
* स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करा.
आजपासून दहा वर्षांनी तुम्हाला तुमच्यात अपेक्षित असलेल्या बदलांची यादी करा. शांतता, सुख, समाधान हवं असेल तर दगदग, धावपळ यापासून तुम्ही लांब राहाल.
* दहा वर्षांनंतरच्या नोकरीच्या स्थानाचा विचार करा. तुम्हाला स्वतःला कोणत्या पदावर बघायला आवडेल, हे ठरवून ठेवा. त्या दृष्टीने प्रयत्न करा. 
* आर्थिक सुबत्तेचा विचार प्रत्येकाच्या मनात असतो. आपल्याला कसं आयुष्य जगायचं आहे, कोणती भौतिक सुखं हवी आहेत, किती संपत्ती असायला हवी याचा विचार करा. त्यानुसार करिअरमध्ये पुढे जायला हवं. करिअरमधलं यश आणि तुम्हाला हवी असलेली भौतिक सुखं यांच्यात समतोल साधला गेला नाही तर तुम्ही स्वतःच्या क्षमतेत वाढवा. किंवा अपेक्षा कमी करा.