मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. गुरूमंत्र
Written By
Last Modified: सोमवार, 15 मार्च 2021 (19:21 IST)

पुस्तक वाचण्याचे फायदे जाणून घेऊ या

बऱ्याच लोकांना पुस्तक वाचण्याची सवय असते. पुस्तक वाचल्याने फायदा होतो. आजच्या काळात पुस्तके देखील डिजीटल स्वरूपात येते. आपण कधीही अध्ययन सामग्री वाचू शकता. आपण ही डिजीटल पुस्तक आपल्या फोनवर किंवा कॉम्पुटर वर कधीही वाचू शकता. काही लोकांना पुस्तक वाचल्या शिवाय झोपच येत नाही. जर आपण देखील पुस्त्तक वाचण्याचे फायदे जाणून घ्याल, तर आपण देखील पुस्तक वाचणे सुरू कराल. चला तर मग पुस्तक वाचण्याचे फायदे जाणून घेऊ या.    
 
1 एकाग्रता वाढते- पुस्तक वाचल्याने एकाग्रता वाढते, कारण आपले लक्ष एकाच गोष्टीवर केंद्रित राहते. या मुळे आपले काम सहज बरोबर होतात. त्यासाठी अत्याधिक परिश्रम करावे लागत नाही. 
 
2 मानसिक तणावात कमतरता -
पुस्तक वाचल्याने तणाव कमी होतो. जेव्हा आपण एखाद्या तणावात असता तेव्हा आपण कोणतेही काम व्यवस्थितरीत्या करू शकत नाही. त्यामध्ये देखील चुका होतात. पुस्तक वाचल्याने तणाव कमी होतो. 
 
3 मेंदू सक्रिय होतो-
पुस्तक वाचल्याने मेंदूचा व्यायाम होतो, या मुळे मेंदू त्वरित सक्रिय होतो. पुस्तके वाचल्याने कोणते ही निर्णय घ्यायला वेळ लागत नाही. मेंदूचा व्यायाम झाल्यामुळे तो सक्रिय होतो. 
 
4 स्मरणशक्ती वाढते- 
जेव्हा आपण एखादे पुस्तक वाचतो तर त्यामधील काही ठळक मुद्दे लक्षात राहतात. दररोज पुस्तक वाचल्याने ते लक्षात ठेवण्यात वाढ होते . काही दिवसानंतर आपण पुस्तक हाताळले नाही तर ते मुद्दे विसरायला होतात,परंतु नंतर वाचल्यावर ते आठवू लागतात. अशा प्रकारे पुस्तक वाचल्याने स्मरण शक्ती वाढते. 
 
5 बोलण्याचा आणि लेखनाचा विकास-
दररोज पुस्तके वाचणे,हे आपल्या शब्द भांडारात वाढ करतात. दररोज आपल्याला नवीन -नवीन शब्द वाचायला मिळतात. ज्यांचा  वापर आपण बोलण्यात किंवा लिखाणात करतो. या मुळे बोलण्याच्या आणि लिखाणाच्या कलेचा विकास होतो.  
 
6 वैचारिक शक्ती वाढते- 
पुस्तक वाचल्याने आपली विचार करण्याची शक्ती वाढते. बऱ्याच वेळा आपल्याला पुस्तक वाचताना अशे काही घटनाक्रम आढळतात त्यांचा अंदाज आपण लावण्याचा प्रयत्न करतो. या मुळे आपली वैचारिक क्षमतेत वाढ होते. 
 
7 चांगली झोप येते- 
पुस्तक वाचल्यावर झोप चांगली येते, या मुळे आरोग्य चांगले राहते. झोपण्याच्या एक तास पूर्वी टीव्ही किंवा मोबाईल हाताळू नये. या मुळे मेंदू शांत होत नाही आणि झोप देखील शांत लागत नाही. झोप येत नसेल तर पुस्तक वाचा झोप लगेच येईल.