चौकशीच्या धमक्या कुणाला देता? फडणवीसांचे आव्हान
मी मिळवले सीडीआर. माझी चौकशी करा. चौकशीच्या धमक्या कुणाला देता? असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. माझी चौकशी करा. त्याआधी खुन्याला अटक करा, असे फडणवीस म्हणाले. विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करीत सभागृह दणाणून सोडले. गोंधळ सुरू असतानाच, अन्वय नाईक प्रकारची चौकशी सुनील वाझे यांच्याकडे होती, त्यामुळे त्यांना हिरेन प्रकरणात ओढून निलंबित करण्याचा डाव भाजपने आखल्याचा आरोप शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केला. त्यावर फडणवीसांचा संताप अनावर झाला. शिवसेना आमदारही वेलमध्ये आले होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब त्यांनी वाचून दाखवला. हिरेन यांची स्फोटके ठेवण्यासाठी वापरलेली गाडी नोव्हेंबरपासून 5 फेब्रुवारीपर्यंत सचिन वाझे वापरत होते. या प्रकरणाचा तपास केवळ वाझे यांनी केला. तीन दिवस हिरेन रोज वाझेंसोबत जायचे, रात्री यायचे. माझ्या पतीचा खून सचिन वाझेंनी केला, असे जबाबात म्हटले आहे.