गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (09:05 IST)

बाप्परे, खासदार नवनीत राणा यांना अॅसिड हल्ल्याची धमकी

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अॅसिड हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे शिवसेनेच्या लेटरहेडवर अत्यंत अर्वाच्च भाषेत ही धमकी देण्यात आली आहे. त्यांना जिवे मारण्याचाही या निनावी पत्रात उल्लेख आहे. याबाबत खासदार राणा यांनी दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून गुन्हाही दाखल झाला आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करतायत. 
 
सोशल मीडियावर एफआयआर कॉपी देखील व्हायरल होत आहे. 13 फेब्रुवारी 2021 रोजी ही तक्रार करण्यात आली आहे. यात खासदार राणा यांनी म्हटलं आहे की, 8 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील माझ्या भाषणाविरोधात शिवसेना पक्षाच्या लेटरहेडवर निनावी पत्राद्वारे, आठ दिवसांत मी माफी मागितली नाही तर मला व माझ्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली आहे.'