शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (16:36 IST)

नाट्यगृहातील 2 कोटीचे साऊंड चोरी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी सर्व साधारण सभेत समोर आणली आहे की पुणे महापालिकेच्या बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील 2 कोटी रुपये किंमतीचे साऊंड चोरीला गेले आहे. त्यावरून सभागृहात एकच गोंधळ उडाला. बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात 2 कोटी रुपयांची अत्याधुनिक साऊंड सिस्टीम (बॉस कंपनीचे) बसवण्यात आली होती. कोरोना काळात दीड वर्षांपासून कोरोनामुळे नाट्यगृह बंद ठेवण्यात आली होती. या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील बॉस कंपनीचे सुमारे 2 कोटी रुपयांचे साऊंड चोरीला गेले आहेत.
 
एवढेच नव्हे तर त्याठिकाणी डुप्लिकेट साऊंड बसवण्यात आले आहेत. प्रशासनाने याप्रकरणी काय कारवाई केली? याप्रकरणी प्रशासनाने तातडीने गुन्हा दाखल केला नाही असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी नगरसेवक सुभाष जगताप यांनी केला आहे.