बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (15:43 IST)

आपला Paytmमोबाईल चोरीला गेला आहे, या सोप्या चरणांचे अनुसरण करून आपले Paytm खाते ब्लॉक करा

भारतात पेटीएम वापरकर्त्यांची संख्या खूप जास्त आहे. देशातील वाढत्या डिजिटायझेशन (Digitalization)मुळे, आजकाल आपल्याला  प्रत्येक काना कोपऱ्यात, दुकानात किंवा मोठ्या मॉल मध्ये पेटीएम ची सुविधा मिळते. पण, अनेक वेळा आपला मोबाईल चोरीला जातो किंवा कुठेतरी गहाळ होतो. अशा परिस्थितीत, सर्वात मोठी काळजी असते की जर तो फोन चुकीच्या हातात गेला तर पेटीएम वॉलेटमध्ये ठेवलेले पैसे चोरीला जाऊ शकतात.
 
जर आपले पेटीएम UPI द्वारे बँक खात्याशी जोडलेले असेल तर ते आपल्या  खात्यातूनही पैसे काढले जाऊ शकतात. यामुळे,आपले मोठे नुकसान होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया त्या ट्रिक्स ज्याद्वारे आपण आपले पेटीएम अकाउंट्स ला गहाळ झालेल्या किंवा चोरीला गेलेल्या फोन मधून सहजपणे डिलीट किंवा ब्लॉक करू शकता. चला जाणून घेउ या काय आहे त्या टिप्स.
 
चोरीला गेलेल्या फोनमधून  अशा प्रकारे पेटीएम अकाउंट डिलीट करा-
 
* अशा स्थितीत मदतीसाठी पेटीएम कंपनीने एक हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. तो हेल्पलाईन क्रमांक आहे - 01204456456. - 
* Paytm Payments Bank कडून कॉल प्राप्त झाल्यावर, दिलेल्या पर्यायांमधून ''lost phone' ' हा पर्याय निवडा.
*  येथे आपल्याला ग्राहक सेवेसाठी दुसरा पर्यायी क्रमांक विचारला जाईल.
* आपण इच्छित असल्यास, आपण आपल्या पालकांचा  किंवा भावंडांचा नंबर  देखील प्रविष्ट करू शकता.
* यानंतर आपण आपला Original  पेटीएम नंबर सबमिट करा.
* यानंतर आपण  log out from all device करण्याचा पर्याय निवडा.
* यानंतर आपले पेटीएम अकाउंट आपल्या स्मार्टफोन मधून आपोआप Logout होईल.
* यासह, आता कोणतीही व्यक्ती ह्या मध्ये पुन्हा Login in  करू शकणार नाही.
* अशा प्रकारे आपण आपल्या पेटीएममध्ये ठेवलेले पैसे सुरक्षित ठेवू शकता.