1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 27 मे 2024 (16:49 IST)

पुणे रस्ता अपघात प्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली

arrest
पुणे कल्याणी नगर पोर्श कार अपघात प्रकरणात  नवे नवे अपडेट समोर येत आहे. पुणे पोलिसांनी रक्त नमुना प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक केली आहे.अतुल  घटकांबळे असे या आरोपीचे नाव आहे. या पूर्वी सकाळी ससूनच्या दोन डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली. या दोन्ही डॉक्टरांनी आरोपी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलले होते. त्यामुळे मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहॉलचे प्रमाण आढळले नाही. 
 
रक्त नमुन्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. अतुल घाटकांबळे असे त्याचे नाव सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिसरा आरोपी सुसून हॉस्पिटलचा कर्मचारी होता. अतुल हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियनचे काम पाहत असे. रक्ताच्या नमुन्यांवरून टेम्परिंग प्रकरणात आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस काळ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू सेडान कारचाही शोध घेत आहेत. याशिवाय पोलिसांनी चालकाचा फोन जप्त केला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घडल्यानंतर रात्री अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी त्याचा चालक गंगाराम याला जबरदस्तीने त्याच गाडीतून त्यांच्या  बंगल्यावर नेले होते.
 
ड्रायव्हरने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, आरोपीच्या कुटुंबीयांनी सांगितले होते की, तो संपूर्ण दोष त्याच्यावर घेण्याचा दबाब टाकला. चालकाने पोलिसांना सांगितले की, घटनेच्या रात्री तो येरवडा पोलीस ठाण्याहून वाघोलीच्या दिशेने आपल्या घराकडे जात होता. त्यादरम्यान, पुण्यातील शास्त्रीनगर चौकाजवळ, अल्पवयीन आरोपीच्या आजोबांनी त्याला जबरदस्तीने बीएमडब्ल्यू कारमध्ये बसवून आपल्या बंगल्यात नेले आणि ड्रायव्हरवर धमकावून स्वत:वरच दोष घेण्यासाठी दबाव टाकला.
 
अल्पवयीन आरोपी मुलाच्या वडिलांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. न्यायालयाने विशाल अग्रवाल यांच्याविरुद्ध प्रोडक्शन वॉरंट जारी केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकूण तीन गुन्ह्यांची नोंद केली असून, त्यानुसार पोलिसांनी विशाल अग्रवालच्या कोठडीसाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज, न्यायालयाने प्रॉडक्शन वॉरंट जारी केले आहे. 

Edited by - Priya Dixit