1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 27 मे 2024 (09:24 IST)

पुणे अपघात : सीएम एकनाथ शिंदे म्हणाले की, कोणालाही मारण्याचे लाइसेंस नाही, बेकायदेशीर बार वर कारवाई सुरु

महाराष्ट्रातील पुण्यामध्ये झालेल्या पोर्ष कार अपघात प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत की, कोणलाही मारण्याचे किंवा अपघात करण्यासाठी लाइसेंस दिले गेले नाही. आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. पुण्यातील अपघातानंतर शहरातील सर्व बेकायदेशीर बार वर कारवाई सुरु आहे. 
 
पुण्यामध्ये एका अल्पवयीन मुलाने पब मध्ये दारू पिऊन नशेमध्ये जलद गतीने कार चालवून दोन जणांना चिरडले. व त्यांच्या जागीच मृत्यू झाला. व आरोपीला 24 तासांच्या आत जमीन मिळाला. शिक्षा म्हणून त्याला निबंध लिहणे आणि ट्रॅफिक पोलिसांसोबत काम करण्यास सांगितले आहे. 
 
सोशल मीडियावर या प्रकरणाची माहिती देण्यात आली. यानंतर लोकांनी आपल्या प्रतिकिया  देण्यास सुरवात केल्या. नंतर अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली. या पूर्व घटनेवर सीएम एकनाथ शिंदे म्हणाले की, पोलिसांना सूचना देण्यात आली आहे की, व पोलिसांनी काही बेकायदेशीर बार वे कारवाई देखील सुरु केली आहे. कोणीही कायदापासून वाचणार नाही मग तो श्रीमंत असो व गरीब. पुणे पोलीस कमिशनर सोबत मी स्वतः चर्चा केली आहे. जो आरोपी आहे त्याला सोडले जाणार नाही. कोणाला लाइसेंस दिलेले नाही मारण्याचे किंवा अपघात करण्याचे. जो दोषी असेल त्याला सोडण्यात येणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. 

Edited By- Dhanashri Naik