1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. वाचकांची पत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 27 मे 2024 (09:20 IST)

राज ठाकरे यांच्या कडून कोकण विभाग पदवीधर जागेसाठी उमेदवारची घोषणा

येत्या 26 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार असून ही निवडणूक 4 मतदार संघात होणार आहे. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षाची जय्यत तयारी सुरु आहे.  राज ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी कोकण मतदार संघाकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. 
कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेने आपल्या अधिकृत X अकाउंटवर परिपत्रक जारी करून माहिती दिली आहे. 
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण मतदार संघ विभागासाठी अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.लोकसभा निवडणुकीत मनसेने बिनशर्त महायुतीला पाठिंबा दिला होता. तसेच महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. 

आता मनसेने विधान परिषदेच्या निवडणुकीत आपला पक्षाकडून उमेदवार उतरवायचा निर्णय घेतला असून उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. हा उमेदवार मनसेचा की महायुतीचा असा प्रश्न उदभवत आहे. 
कोकण पदवीधर मतदार संघातून डावखरे हे भाजपचे उमेदवार असून त्यांचा कार्यकाळ संपत असून त्याच जागेवर मनसेने उमेदवार जाहीर केले आहे. विधान परिषद निवडणूक मतदान 26 जून रोजी होणार असून 1 जुलै रोजी निकाल लागणार आहे. 

Edited by - Priya Dixit