पुण्यातून महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी पोलिसांनी केली खासगी वाहनातून 5 कोटींची रक्कम जप्त
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 20 नोव्हेम्बर ला होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र निवडणुकीच्या पूर्वी पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर ( Khed -Shivapur) टोल नाक्यावरून एका खासगी वाहनातून 5 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीतून वाहनातून जप्त केलेली रकम पाच कोटी रुपयांची आहे.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर टोलनाका परिसरात एका मोटारीतून मोठ्या प्रमाणावर रोकड नेण्यात येत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाल्यावर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना संशयित वाहनांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. रात्री 8 वाजेच्या सुमारास एका संशयित खासगी वाहनाला थांबविण्यात आले आणि त्या वाहनातून 5 कोटींची रकम जप्त करण्यात आली.
पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून ही रक्कम कुणी दिली आणि कुठे घेऊन जायचे होते या बाबत चौकशी करण्यात आली आहे. राजगड खेड -शिवापूर पोलीस ठाण्यात ही रक्कम नेण्यात आली असून पोलीस ठाण्यात रक्कम मोजण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरु होते.
हे वाहन कुठून आले आणि पैसे कोठे जात होते, याचाही तपास सुरू आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास लावत आहे.
Edited By - Priya Dixit