गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 24 मे 2021 (16:45 IST)

पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता

यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर राज्यातील अनेक शहरांमध्ये ढगाळ वातावरण आहे तर पुण्यात मंगळवारी मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसंच बुधवारीही मुसळधार पाऊस असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
भारतीय हवामान विभागाने पुण्यात या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवला असून बुधवारपासून वादळी वारे आणि शनिवारपासून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. 
 
राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागात शनिवारपासून मेघगर्जनेसह हलक्या पावसाला सुरुवात होईल. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे सोमवारी आणि मंगळवारी मेघगर्जनेसह विजा आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 
 
आठवडाभर शहरातील कमाल तापमान 36 डिग्री सेल्सियस ते 38 डिग्री सेल्सियस पर्यंत राहील. 1 जूनपूर्वीच मान्सूनचा आगमन होण्याची शक्यता असून 27 मे ते 2 जून दरम्यान केरळमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे यंदा वेळेपूर्वीच पावसाची सुरुवात होईल, असंही हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.