बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : रविवार, 9 जानेवारी 2022 (10:04 IST)

पंत प्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द

पंत प्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्याच्या दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंत प्रधान नरेंद्र मोदी हे 28 जानेवारीला पुण्याच्या दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या हस्ते विविध कामांचे उदघाटन होणार होते.तसेच मेट्रोचे उदघाटन होणार होते. पण कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे त्यांच्या दौरा रद्द करण्यात आला आहे. ही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जी पुणे प्रशासनाला कळविण्यात आली आहे. त्यांचा हा दौरा आता लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या राज्यात कोरोनाचे संसर्ग वाढत आहे. राज्यात 41 हजार पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. ओमिक्रॉनचे 133 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात नवीन निर्बंध लावण्यात आले आहे.