गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जुलै 2023 (14:48 IST)

पुण्यातील कॉलेजमध्ये ख्रिश्चन धर्माची प्रार्थना केल्यामुळे प्राचार्यांना मारहाण Video Viral

Pune News पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये एक धक्कादायक प्रकारात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून महाविद्यालयातील प्राचार्यांना मारहाण करण्यात आली आहे.
 
कॉलेजमध्ये ख्रिश्चन समाजाची प्रार्थना घेतली जात असल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भातील व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील तळेगाव आंबी येथे असलेल्या डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेच्या महाविद्यालयातील लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे का लावले? तसेच ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना का घेतल्या जातात? या दोन्ही आरोपांवरुन प्राचार्य अलेक्झांडर यांना मारहाण करण्यात आली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत त्यांचे कपडे फाटल्याचं दिसून येत आहे. या प्रकारानंतर प्राचार्यांची बदली करा अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.