बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 19 मार्च 2023 (10:32 IST)

Pune Accident : मुंबईकडून बंगलोरच्या दिशेने जाणारी खासगी बस कोसळून अपघात

मुंबई कडून पुण्यामार्गे बंगळुरूला जाणाऱ्या शर्मा ट्रॅव्हल्सच्या खासगी बसचा चांदणी चौकात रस्त्यावरून कोसळून अपघात झाला.ही घटना शनिवारी रात्री 10 :30 च्या सुमारास घडली. या अपघातात आठ ते दहा प्रवासी जखमी झाले आहे. बावधन येथे मुख्य रस्त्यावरून सेवा रस्त्यावर जात असताना बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस 15 ते 20 फूट खाली कोसळून हा अपघात झाला. या बस मध्ये 35 प्रवासी असून आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीनं रुग्णालयात  दाखल केले आहे. अपघातामुळे चांदणी चौक परिसरात  वाहतूक  कोंडी झाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने बाजू करून वाहतूक सुरळीत केली. 
 
Edited By - Priya Dixit