शनिवार, 13 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (16:04 IST)

पुणे शहर पुन्हा हादरले ! रिक्षाचालकाकडून झोपेत असलेल्या चिमुरडीचे अपहरण करून बलात्कार

Pune city shakes again! Chimurdi abducted by a rickshaw puller and raped Maharashtra News Pune News In Marathi Webdunia Marathi
आणखी एका बलात्काराच्या घटनेने पुणे शहर हादरले आहे.रेल्वे स्थानक परिसरात आपल्या कुटुंबीयांसह झोपलेल्या सहा वर्षे चिमुरडीचे एका रिक्षाचालकाने अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेने पुर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
 
सागर मारुती मांढरे (वय 39) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्रीच्या सुमारास सहा वर्षाची ही चिमुरडी पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील फुटपाथवर झोपली होती.मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ती गाढ झोपेत असताना आरोपीने तिला रिक्षात उचलून ठेवले. त्यानंतर सातारा रस्त्यावरील एका इमारतीत घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
 
दरम्यान सकाळी उठल्यानंतर कुटुंबीयांना पीडित मुलगी न दिसल्याने त्यांनी आजूबाजूला शोधाशोध केली. परंतु मुलगी सापडली नसल्यामुळे त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.पुणे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे च्या मदतीने पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली.तेव्हा सातारा रस्त्यावरील एका इमारतीत ती पोलिसांना सापडली.तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिच्यावर बलात्कार झाला असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर पोलिसांनी काहीवेळातच आरोपीचा शोध घेऊनही त्याला अटक केली आहे. बंडगार्डन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.