रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (22:07 IST)

6 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करुन बलात्कार, नराधमाला अटक

पुणे स्टेशन परिसरातील एका अल्पवयीन मुलीच्या बलात्कार झाला आहे. पुण्यातील ३९ वर्षाच्या रिक्षा चालकाने या ६ वर्षीय चिमुकलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला. या नराधम रिक्षा चालकाला बंड गार्डन पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्याच्याकडेला आईच्या शेजारी झोपलेल्या या चिमुकलीला रात्री नराधम रिक्षा चालकाने उचलून नेले. त्यानंतर निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील फुटपाथवर आईच्या शेजारी झोपलेल्या ६ वर्षीय चिमुकलीला रात्री १ च्या सुमारास रिक्षा चालकाने उचलून नेले. त्यानंतर तिला रिक्षात घालून मार्केट यार्ड परिसरात नेण्यात आले. तिथे नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. यादरम्यान चिमुकलीच्या आईला जाग आली असता तिच्या शेजारी झोपलेली मुलगी गायब असल्याचे दिसली. यानंतर तिने पोलीस स्टेशन गाठत यासंदर्भातील तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ या मुलीचा शोध सुरु केला. यावेळी सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपी मार्केट यार्ड परिसरात दिसला. त्यानंतर पोलिसांनी मार्केट यार्ड गाठत आरोपीला शोधून त्याला अटक केली. सध्या या अल्पवयीन मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.