1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 18 ऑक्टोबर 2023 (10:05 IST)

Pune: ड्रग्ज माफिया ललित पाटीलला चैन्नईतून अटक केली

arrest
ड्रग्ज माफिया ललित पाटील ला काही दिवसांपूर्वी पुण्यातील चाकण भागातून ड्रग्ज तस्करी करताना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात झाली. तेथून त्याने कारागृहातील कमर्चाऱ्यांच्या साहाय्याने पोटाचा विकार असल्याचा बनाव रचून ससून रुग्णालयात तीन महिन्यांपूर्वी दाखल झाला असून तो तेथून ड्रग्जचे रॅकेट हाताळायचा. पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी सापळा रचून दोन कोटींचे अम्लीय पदार्थासह रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आणले. 

तो रुग्णालयातून पसार झाला असून त्याला शोधण्यासाठी मुंबई व नाशिक पोलिसांची  दहा पथके माघारी होते. त्याला चैन्नईतून अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ड्रग्ज माफिया ललित पाटीलला चैन्नईतून अटक केली आहे. पोलिसांनी त्याला पुण्यात आणले असून न्यायालयापुढे हजर करणार आहे. 

आरोपी ललितला रुग्णालयात सर्व सुविधांचा पुरवठा केला जात होता. त्याला या सुविधा कोण पुरवत होता तसेच या ड्रग्ज रॅकेट मागे कोणाचा हात आहे ?तो तेथून ड्रग्सचे रॅकेट कसे चालवायचा या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्याची माहिती समोर आली आहे. 
 
 Edited by - Priya Dixit