रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (16:54 IST)

पुणे: मुलीची चित्तथरारक सुटका

पुण्यातील शुक्रवार पेठेतील गणेश अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली असून खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकलेल्या मुलीची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली आहे. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या मुलीचे प्राण वाचवले आहेत. 
 
अग्निशामक दलाला सकाळी साडेनऊच्या सुमारास एक इमर्जन्सी कॉल आला. यामध्ये एक मुलगी क्रेटला अडकली असल्याचे अग्निशामक दलाला सांगण्यात आले. अग्निशामक दलाने तत्काळ घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. त्यात त्यांनी बघितले की, एक मुलगी चौथ्या मजल्यावर वरून एका खिडकीच्या ग्रिला साडीचा आधार घेऊन लटकलेली आहे आणि मुलीचा हात सुटल्यास ती कधीही खाली पडू शकते अशी स्थिती होती. ते पाहून अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने खाली जाळीचे नेट धरून ठेवले. त्यानंतर काही जण वरच्या मजल्यावर जाऊन त्यांनी तेथून रस्सी तिच्याकडे टाकली तोपर्यंत दुसर्याध कर्मचार्यांगनी शिडी लावून त्यावरून जवान‍ तिच्यापर्यंत पोहचले. जवानांनी तिला पकडून खाली आणले. याबाबत तिच्या नातेवाइकांशी अग्निशमन दलाच्या अधिकार्यांंनी चौकशी केल्यावर ती टेरेसवरून पाय घसरून पडली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.