बुधवार, 1 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (10:34 IST)

पंतप्रधान मोदी आज किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता जारी करतील

Prime Minister Modi will release the next installment of Kisan Sanman Nidhi Yojana toda National News In Marathi Webdunia Marathi
या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना दरवर्षी चार हप्त्यांमध्ये 6000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 1.38 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता जारी करतील. याअंतर्गत, सकाळी 12.30 वाजता 9.75 कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये 19500 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली जाईल.
 
पीएमओकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही लाभार्थी शेतकऱ्यांशी देखील चर्चा करतील. याशिवाय, पंतप्रधान राष्ट्राला संबोधितही करतील.
 
या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना दरवर्षी चार हप्त्यांमध्ये 6000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 1.38 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.
 
महोबामध्ये उद्या उज्ज्वला 2.0 योजना सुरू 
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील महोबा येथे दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबांसाठी 10 ऑगस्ट रोजी वीरभूमी महोबा येथून उज्ज्वला 2.0 लाँच करतील. पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद स्थापित करतील.
 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महोबा येथे कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी येत आहेत. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी देखील त्यांच्यासोबत उपस्थित राहतील. जिल्हा प्रशासनाने कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे.
 
गुरुवारी आयुक्त  आणि आयजी यांच्यासह डीएम आणि एसपी पोलीस लाईन मैदान आणि हेलिपॅडचा आढावा घेण्यासाठी आले होते. जिल्हा दंडाधिकारी यांनी सांगितले की, 10 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उज्ज्वला योजनेचे वर्चुअल प्रक्षेपण करतील.
 
महोबामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी पोलीस लाईन मैदानावर उपस्थित राहतील. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.