शुक्रवार, 5 जुलै 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 9 सप्टेंबर 2023 (19:42 IST)

Pune :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पस मधील वसतिगृहाच्या मेसमध्ये जेवणात आळ्या आढळल्या

online food
Worms Found in Food:  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कॅम्पसच्या मेसमध्ये दिला जाणाऱ्या अन्नामध्ये आळ्या आढळल्या या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात संतापाची लाट उसळली आहे.  या प्रकारणांनंतर विद्यार्थी आता मेसचा ठेका तातडीनं रद्द करण्याची मागणी करत आहे. वसतिगृह क्रमांक 8 आणि 9 च्या मेसमध्ये तयार अन्न दिले जातात. जेवणात आळ्या आढळला. या घटनेची माहिती विद्यार्थ्यांनी मेसच्या कर्मचाऱ्यांना कळवली. त्यांनतर मेसच्या ठेकेदाराने शिजवण्यासाठी वापरणाऱ्या तांदुळाला बदलण्यास सांगितले. वारंवार  तक्रार करून देखील विद्यापीठ प्रशासन अपयशी ठरले आहे. 
 
 आता विद्यार्थ्यांनी या वर अधिक ठाम भूमिका घेतली आहे. कॅंटीन समिती स्थापन करण्यासाठी कुलगुरूंना बोलावले असून विद्यापीठाचे कुलसचिवांनी या प्रकरणाची माहिती नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणावर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 
 




Edited by - Priya Dixit