शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 27 मे 2024 (17:23 IST)

Pune Porshe Accident : फॉरेन्सिक विभागाच्या HOD ला अटक, पैसे घेऊन आरोपीचे रक्ताचे नमुने डस्टबिनमध्ये फेकले

पुणे कार अपघात प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आले आहे. फॉरेन्सिक विभागाच्या HODला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात ससूनच्या दोन डॉक्टरांना देखील अटक केली आहे. या सर्वांवर पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप आहे.
 
पुण्याच्या ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक टीमवर लाच घेऊन पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिकच्या प्रमुखाने तीन लाख रुपयांची लाच घेतली होती. या बदल्यात त्यांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने कचरा कुंडीत फेकले. आणि दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेऊन अहवाल तयार केला. त्यामुळे अल्पवयीन मुलाच्या रक्तात अल्कोहोल आढळले नाही. 
 
पुणे पोर्श कार अपघातातील अल्पवयीन आरोपीची वैद्यकीय चाचणी पुण्याच्या ससून रुग्णालयात करण्यात आली. अल्पवयीन आरोपीने मद्यधुंद अवस्थेत दोन अभियंताच्या दुचाकीला धडक दिली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. फॉरेन्सिक तपासणीत आरोपीने मद्यपान केले नसल्याचा दावा डॉक्टरांनी केला असून फॉरेन्सिक टीम ने आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून दिले. त्यामुळे त्याच्या रक्ताच्या नमुन्यात मद्याचे पुरावे मिळाले नाही. आता या प्रकरणावर मोठी कारवाई करत फॉरेन्सिक विभागाचे HOD आणि दोन डॉक्टरांना ताब्यात घेतले आहे. 
 
. 18 मे रोजी रात्री दारूच्या नशेत 17 वर्षीयअल्पवयीन मुलाने पोर्श कारने दोघांना धडक दिली आणि दोघांचा जागीच मृत्यू झालाआरोपी अल्पवयीन हा महाराष्ट्रातील मोठा बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. त्यामुळे विशालने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. खोटा वैद्यकीय अहवाल मिळण्यापासून ते ड्रायव्हरला दोष देण्यापर्यंत अनेक खटले भरकटवण्याचा प्रयत्न झाला. पण सर्व प्रयत्न फसले.
 
अपघातानंतर आरोपीला 19 मे रोजी सकाळी 11 वाजता पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्याची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. मात्र, प्राथमिक तपासणीत त्याच्या रक्ताच्या नमुन्यात मद्यपान केल्याचा कोणताही पुरावा आढळून आला नाही. नंतर आरोपीच्या दुसऱ्या रक्ताचा अहवाल आल्यावर त्याने मद्यपान केल्याचे आढळले. ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाने पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप आहे. 
 
Edited by - Priya Dixit