गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 3 जून 2024 (09:15 IST)

पुणे पोर्श कार अपघात प्रकरण : 'गाडी चालवतांना खूप नशेमध्ये होतो,' अल्पवयीन आरोपीने पोलिसांजवळ दिली कबुली

Pune Porsche car accident case
पुण्यामधील पोर्श कारने दोन जणांचा बळी घेतला. यामध्ये आरोपीने पोलिसांजवळ कबुली दिली की गाडी चालवतांना मी खूप नशेमध्ये होतो. तर आरोपीच्या आई वडिलांना न्यायालयाने पोलीस कोठडीमध्ये पाठवले आहे. 
 
पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाने आता नवीन वळण घेतले आहे. आपल्या लग्जरीयस पोर्श कार ने दोन जणांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीने पोलिसांजवळ कबुली दिली की, तो गाडी चालवतांना खूप नशेमध्ये होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी म्हणाला की मी नशेमध्ये होतो त्यामुळे मला त्यावेळेच काहीच आठवत नाही आहे.  
 
या दरम्यान न्यायालयाने आरोपीच्या आईवडिलांना पोलीस कोठडीत पाठवले आहे. आरोपीच्या आईला एक जूनला ब्लड सँपल बदलले म्हणून पोलिसांनी अटक केली. तर आरोपीच्या वडिलांना पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. 

Edited By- Dhanashri Naik