शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (08:28 IST)

पुणे ग्रामीण पोलिसांनी बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश

पुणे ग्रामीण पोलिसांनी  एक मोठी कारवाई केली आहे. पुणे विद्यापीठासह इतर महाविद्यालयांची बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही छापेमारी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) केली आहे.नीरा येथे धाड टाकून 3 जणांना अटक  करण्यात आली आहे.या तिंघावर जेजुरी पोलिस ठाण्यात एफआय आर दाखल झाला आहे.
 
याबाबत माहिती अशी, गणेश संपत जावळे,मनोज धुमाळ (दोघे रा. नीरा) आणि वैभव लोणकर (रा. बारामती) या तिघांना याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इतर महाविद्यालयांची बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका तयार करुन त्यांची विक्री केली जात असल्याची माहिती एलसीबीचे एपीआय संदीप येळे यांना मिळाली होती. या माहितीनूसार पथकानी चौकशी करुन नीरा येथील समीक्षा प्रिंटिंग प्रेसमध्ये छापा टाकला.त्यात मोठ्या प्रमाणात बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. तेथील तिंघाना पोलिसांनी अटक  केली आहे.
 
दरम्यान, आता ही टोळी बनावट प्रमाणपत्र बनवण्याचे काम ते किती दिवसांपासून करत होती.आजतागायत किती लोकांना असे बनावट प्रमाणपत्र दिलेत.त्याचबरोबर किती जणांनी बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरीसाठी, पुढील शिक्षणासाठी आणि बढतीसाठी, वेतनवाढीसाठी उपयोग केला आहे, याची देखील चौकशी करण्यात येणार आहे.