शुक्रवार, 5 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (09:38 IST)

भावाने वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून बहिणीला पेटवले

The brother set the sister on fire over an ancestral property dispute Maharashtra News Pune News Webdunia Marathi
संपत्तीच्या वादातून एका भावाने आपल्या सख्ख्या मोठ्या बहिणीला पेटवून देण्याची धक्कादायक घटना औन्ध मधील एका सोसायटीत शुक्रवारी घडली.या घटनेत महिला गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी चतृशृंगी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीला अटक करण्यात आली आहे.  
 
शरद मनोहर पतंगे(45)असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.या घटनेत राजश्री मनोहर पतंगे या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत.आरोपी आणि राजश्री हे सक्खे भाऊ बहीण आहे.त्यांना एक भाऊ अजून आहे.राजश्री या अविवाहित असून भावाकडे राहतात. हा फ्लॅट त्यांच्या आईच्या नावावर आहे.त्याच्या वाटणीवरून दोघांमध्ये वाद सुरु आहेत.

शुक्रवारी मनोहर दारू पिऊन घरी आला आणि दोघांमध्ये वाटणीला घेऊन वाद सुरु झाले. रागाच्या भरात येऊन मनोहरने राजश्रींच्या साडी ला पेटवले.त्यांच्या दुसऱ्या भावाने आपल्या बहिणीला वाचवण्याचे आणि आग विझवण्याचे प्रयत्न केले.तो वर राजश्रीच्या साडीने पेट घेऊन मानेपासून पायापर्यंतचा भाग भाजला होता.तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.त्या 40 टक्के भाजल्या आहे.आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.