रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (08:07 IST)

नगरसेवकाच्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याकडून 13 लाखांचा अपहार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्यामुलाच्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने 13 लाखाचा अपहार  केल्याचे समोर आले आहे.हा प्रकार पुण्यातील मुंढवा येथील सिद्धार्थ पेट्रोल पंपावर घडला आहे.हा पेट्रोलपंप राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप यांचा मुलगा श्रीनिवास जगताप,सून मेघा संजय भिसे यांच्या मालकीचा आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे.
 
श्रीहरी दामू बंडगर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. बंडगर हा जगातप यांच्या पंपावर दैनंदिन आर्थिक व्यवहाराच्या नोंदी संगणकामध्ये करण्याचे काम करत होता. हा प्रकार त्याने 5 जुलै ते 22 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडला आहे.
 
सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने यांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ पेट्रोल पंपावरुन काही व्यवसायिकांना उधारीवर पेट्रोल आणि डिझेल दिले जाते.या व्यवहाराचा हिशोब ठेवला जातो.बंडगर याने उधारीची रक्कम वाढवून दैनंदिन कॅश कलेक्शन कमी दाखवून त्यातून रोज पैसे काढत होता.

उधारी वाढत असल्याची बाब श्रीनिवास जगताप यांच्या लक्षात आली.त्यामुळे त्यांनी उधारी वाढवू नका अशा सूचना कामगारांना दिल्या. दरम्यान, ज्यांच्याकडे उधारी दाखवण्यात आली त्यांच्याशी संपर्क साधून उधारी बाबत माहिती घेतली. यानंतर दैनंदिन जमा झालेली रोख रक्कम आणि उधारी यामध्ये ताळमेळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ताळमेळ बसत नसल्याने 12 लाख 95 हजार 333 रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले.याबाबत मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.