रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 (18:32 IST)

Pune : महिला पोलीस शिपायावर गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल

rape
Pune :पोलिसांना जनतेचे रक्षक म्हणतात पण हेच रक्षक भक्षक झाले तर काय म्हणावं. पोलीस दलातील एका महिला पोलीस शिपायावर पोलीस शिपायाने शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार करण्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.  

या प्रकरणी एका महिला पोलीस शिपायाने खडकवासला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी दीपक सीताराम मोघेने सदर महिलेशी ओळख केली नंतर टाळेबंदीच्या काळात तो तिच्याकडे जेवायला जायचा तिच्या शीतपेयेतून त्याने महिलेला गुंगीचे औषध देऊन पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि व्हिडीओ बनवला. तिच्याकडील दागिने, लॅपटॉप असा मुद्देमाल चोरी केला आहे. 

आरोपीने महिलेवर बलात्कार करून व्हिडीओ बनवला आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. आणि पती सोबत घटस्फोट घेण्यास बाध्य केले. तसेच तिच्या घरातील दागिने, लॅपटॉप ,मोबाईल चोरून नेले. 

महिलेने या प्रकरणी आरोपी दीपक सीताराम मोघेच्या विरोधात तक्रार केली असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.  
 
Edited by - Priya Dixit