1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जानेवारी 2024 (16:04 IST)

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार

gangster Sharad Mohol shot dead
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्यावर गोळीबार केल्याची घटना कोथरूडच्या सुतारदरा येथे आज शुक्रवारी घडली आहे. त्यांना एक गोळी लागली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. 
हल्ला करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 
 
शरद मोहोळ कोथरूडच्या सुतारदरा  जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्या पैकी एक गोळी त्यांच्या खांद्याला  लागली त्यांना जखमी अवस्थेत कोथरुडच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्यावर हा हल्ला कोणी केला.पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला का हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. 

 Edited by - Priya Dixit