सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 28 डिसेंबर 2023 (14:29 IST)

Pune Crime पुण्यात पोलिसांसमोर भररस्त्यात कोयत्याने हाणामारी

crime
Pune Crime पुण्यात कोयता गॅंगची दहशत वाढत चालली आहे. आता तर कोयता गॅंग भररस्त्यात पोलिसांसमोरच सर्रासपणे कोयत्याने मारामारी करत असल्याचे समोर आले आहे. अशात पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचे समोर येत आहे. 
 
वडगाव शेरी भागात नुकताच दोन गटात झालेल्या वादात एका गटाकडून कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे. या हाणामारीत 3 तरुण जखमी झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार महिला पोलिसांसमोर घडला. आरोपी पोलिसांसमोर पीडित तरुणांवर कोयत्याने तसेच दगडाने मारहाण करत होते. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. 
 
वडगाव शेरीतील आनंद पार्कच्या पवन सुपर मार्केटजवळील दिगंबर नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. सौरभ संतोष पाडळे यांच्या तक्रारीवरुन अनुज जितेंद्र यादव, ऋषिकेश टुनटुन चव्हाण, आकाश भरत पवार, अमोल वसंत घोरपडे यांना अटक करण्यात आली आहे.