शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 डिसेंबर 2023 (17:34 IST)

पुण्यातील तळवडे येथील कारखान्यात भीषण आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू

Khalistan radicals set Indian Consulate on fire in San Francisco
पुण्यातील तळवडे येथे ज्योतिबा मंदिराच्या मागे असलेल्या एका फायर क्रेकर कारखान्यात भीषण स्फोट होऊन आग लागली. या अपघातात 7 महिला कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. सदर घटना  दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली असून केकवर लावल्या जाणाऱ्या फायर क्रेकरची कंपनीचे गोदाम होते. तापमानात वाढ झाल्याने हा स्फोट झाला असण्याची  शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कंपनीला दार नसून शटर असल्याने येणे जाणे करण्यासाठी हाच मार्ग होता आणि शटर बंद असल्याने या महिला कामगार तिथेच अडकून पडल्या आणि आगीत होरपळल्या.

स्फोटाच्या आवाजाने शटर बंद होऊन या महिला तिथेच अडकल्या. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आली असून अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. या अग्निकांडात 7 महिला कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला. 

हे फटाक्याचं गोदाम असून अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. आग  कशामुळे लागली याचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit