1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 5 डिसेंबर 2023 (19:48 IST)

ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले, स्कूल बस झाडावर आदळली, अन् मग .....

Rising Star School
पुण्यातून अपघाताची एक धक्कदायक घटना समोर आली आहे.  पुण्यातील वाघोली येथील रायझिंग स्टार या स्कूलची बस झाडावर आदळल्याने भिषण अपघात झाला आहे. यामध्ये बसमधील काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे.  त्यांच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून बस झाडावर आदळल्याने हा अपघात झाला आहे.
 
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार ,ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं व्हिडीओतून स्पष्ट होतंय.  या अपघाताने विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
 
या बसवरती आरटीओचे नियंत्रण नसल्याचा आरोप पालकवर्गाकडून केला जात आहे. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहे.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor