Pune : चोरीच्या संशयावरून महिलेशी अपमानास्पद वागणूक
पुण्यात एका हॉटेलच्या शेफ ने हॉटेल मध्ये काम करणारी महिला कामगाराशी अंडी चोरीचा आरोप करून अपमानास्पद वागणूक केल्याची घटना घडली आहे. महिलेशी अंडी चोरले आणि ते कुठं लपवले असे विचारत विनयभंग केला. मुकेश पुंडील असे या आरोपीचे नाव आहे.
पुण्यातील येरवडा परिसरातील एका हॉटेल मध्ये मुकेश पुंडील हा कुक आहे. रविवारी पीडित महिला किचन मध्ये काम करत असताना मुकेश तिथे आला आणि तू अंडी चोरले आहेस, कुठे लपवले आहे सांग.असं म्हणत महिलेच्या अंगाची झडती घेतली आणि तिला कपडे काढण्यास भाग पाडले. नंतर ती घरी जायला निघाली तेव्हा त्याने तिचा रास्ता अडवत तिचा विनयभंग केला आणि घाणेरडी शेरेबाजी केली.
अपमानास्पद वागणूक मिळाल्यावर महिलेने तातडीनं येरवडा पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार सांगून आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली.पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत असून. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
Edited By- Priya DIxit