गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 23 नोव्हेंबर 2023 (12:56 IST)

पुण्यात भाडेकरुची झोपमोड केल्याने घरमालकाची हत्या

murder
पुण्यात लोणीकळभोर येथे एका धक्कादायक घटनेत दुपारी झोपमोड केल्याने एका भाडेकरूने घरमालकाचा पाण्यात बुडून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दादा ज्ञानदेव घुले (वय 50) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आरोपीचे नाव संतोष राजेंद्र धोत्रे (वय ३७) असून याला अटक करण्यात आली आहे.
 
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दादा घुले यांनी आरोपी संतोष धोत्रेला त्यांच्या चाळीतील खोली भाड्यावर दिली आहे. हे दोघे ही प्लम्बिंगचे काम करीत होते. सोमवारी 20 नोव्हेंबरला रोजी दुपारी 12 ते दीडच्या सुमारास घुले त्यांच्या घराबाहेर दुचाकीच्या रेसचा मोठा आवाज करत होते. या आवाजामुळे संतप्त झालेल्या संतोषने घुले यांना गाडीचा आवाज कमी करण्यास सांगितले. या वरुन दोघांमध्ये खूप वेळ वाद झाला आणि आरोपीने घुले यांना बेदम मारहाण केली नंतर घराच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीत बुडवून त्यांचा खून केला.
 
संध्याकाळपर्यंत दादा घुले दिसत नसल्यामुळे नातेवाइकांनी त्यांचा शोध सुरू केला तेव्हा पाण्याच्या टाकीत त्यांचा मृतदेह तरंगत असल्याचे समोर आले. या प्रकरणी संतोष धोत्रे याला पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.