पुण्यातील थिएटरबाहेर तलवारीने हल्ला करत तरुणाचं निर्घुण खून
पुण्यातील मंगला टॉकीजबाहेर हत्येची थरारक घटना समोर आली आहे. पूर्व वैमनस्यातून 10-12 जणांनी मिळून तलवारीने हल्ला करत तरुणाची हत्या केली आहे.
या टोळक्याने तलवार आणि कोयत्याने सपासप वार करुन एका तरुणाचा निर्घुण खून केला. बुधवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
नितीन म्हस्के असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सागर कोळानट्टी ऊर्फ यल्ल्या (वय 32), मलिक कोळ्या ऊर्फ तुंड्या (वय 24), इम्रान शेख (वय 32), पंडित कांबळे (वय 27), विवेक नवधर ऊर्फ भोला (वय 24), लॉरेन्स पिल्ले (वय 33), सुशील सूर्यवंशी (वय 30), मनोज हावळे ऊर्फ बाबा (वय 25), आकाश गायकवाड ऊर्फ चड्डी (वय 24), रोहन ऊर्फ मच्छी मल्लेश तुपधर (वय 20), विवेक भोलेनाथ नवधरे (वय 27), अक्षय ऊर्फ बंटी साबळे (वय 21), विशाल भोले (वय 30) सर्व रा. ताडीवाला रोड यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार ताडीवाला परिसरात टोळीच्या वर्चस्वावरुन दोन टोळ्यांमध्ये नेहमी भांडणे होत होती. नितीन म्हस्के हे गदर 2 चित्रपट पाहण्यासाठी मंगला चित्रपटगृहात आला असताना दुसरी टोळी आऊट गेटला दबा धरुन बसले होते. चित्रपट रात्री 1 वाजता संपल्यानंतर म्हस्के बाहेर पडला आणि त्यावेळी दहा ते बारा जणांनी त्याला घेरलं.
त्यावर तलवार, पालघन, गज, काठ्या आणि फरशीच्या तुकड्यांनी सपासप वार केले. त्याचा जागीच मृत्यु झाला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलीस अधिक तपास करत आहेत.